‘ट्रिपल सीट’ जाणे भोवले

Share This News

नागपूर : ट्रिपल सीट जाणे भोवले असून त्यातून घडलेल्या अपघातात एकाला प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना भीवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री उशीरा घडली. वैभव विठ्ठल सवासागडे (वय २४, रा. मोखाडा) हा त्याच्या मोटरसायकलवर शुभम रवींद्र मघाम (वय २१) आणि गंगाधर विठ्ठल उईके (वय ३५) यांना ट्रिपल सिट बसवुन जात होता. भीवापुर ते मोखाडा या मार्गावरून जात असतान वैभवचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे झालेल्या अपघतात उईके यांचा मृत्यू झाला.


याखेरीज जिल्ह्यात घडलेल्या अन्य दोन विविध अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. यातील पहिली घटना मंगळवारी संध्याकाळी ६च्या सुमारास उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहपा रोड परिसरात घडली. या अपघातात चारचाकी वाहनाच्या धडकेत एका मोटरसायकस्वाराचा मृत्यू झाला. वरसेल वसराम चव्हाण, (वय ४५ रा. मोहपा) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तसेच दुसरी घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा खानगाव येथे मंगळवारी दुपारी ३च्या सुमारास घडली. निखील बबनदास महंत (वय ३२, रा. रा. खानगाव) असे याप्रकरणातील मृतकाचे नाव आहे. तो मोटरसायकलवरून जात असताना एका अनोळखी ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.