Gold Price Today : सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव

Share This News

मुंबई : गुरुवारी सोन्या-चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे मौल्यवान धातूच्या किंमती घसरल्या. घसरण झाली. आज एमसीएक्सवर सोन्याचे वायदा 0.33 टक्क्यांनी घसरून ते प्रति 10 ग्रॅम, 48,702 रुपयांवर स्थिरावला आहे. सोन्याच्या किंमती सलग पाचव्या दिवशी घसरल्या, आज एमसीएक्सवरील चांदीचा दर 1% ने घसरून 65,866 प्रती किलो झाला. (gold rate today down on 28 january 2021 here know the latets rates)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आज अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत स्पॉट सोन्याचे 0.3 टक्क्यांच्या घसरणीसह दर प्रति औंस 1,839.21 डॉलर होता. डॉलर निर्देशांक 0.12% वाढून 90.745 वर पोहोचला. पॉलिसी बैठकीत अमेरिकन मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह यांनी व्याज दर शून्याजवळ ठेवलं आहे.

तर चांदी 0.2% घसरून 25.18 डॉलर प्रति औंसवर, तर प्लॅटिनम 0.2% खाली घसरून 1,063.76 डॉलरवर पोहोचलं आहे. जगातील सर्वात मोठा सोन्याचा एक्सचेंज ट्रेडेड फंड असणारी एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची धारणा बुधवारी 0.3 टक्क्यांनी घसरून 1,169.17 टन झाली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.