सोने पुन्हा महागले, जाणून घ्या आजचे दर / Gold prices up again, find out today’s rates
गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या किंमती मोठी भाव वाढ सुरु आहे. मात्र दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण होताना दिसत आहे. यातच आज कमॉडिटी बाजाराचा सोने आणि चांदीच्या किंमतीने तेजीने सुरुवात केली. आज सोन्याची किंमत १३२ रुपयांनी वाढली आहे तर चांदीमध्ये सोन्यापेक्षा अधिक म्हणजे ५०० रुपयांची भाव वाढ झाली आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४६१९० रुपयांवर स्थिरावले. मात्र दोन दिवसांपासून मागील आठ महिन्यातील सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
गोल्ड रिर्टन वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, सोमवारी २२ कॅरेट सोन्याचा भाव मुंबईत ४५१३० रुपये इतका होता. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६१३० रुपये आहे. पुण्याचा विचार केला असता पुण्यात २२ कॅरेटसाठी सोने खरेदीधारकांना ४७१३० रुपये तर २४ कॅरेटसाठी ४६१३० रुपये मोजावे लागणार आहे. दिल्लीत हाच सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४५४२० इतका आहे तर २४ कॅरेटसाठी ४९४५० रुपये झाला आहे. त्याप्रमाणे कोलकत्तामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३२० रुपये आहे. त्यामुळे सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १२० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव आता ४६३१७ रुपये झाला आहे. तर चांदीमध्ये ४७१ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६९४८३ रुपये झाला आहे.