गोंदिया :विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

Share This News

तालुक्यातील सोनी परिसरातील वीज समस्यामुळे निर्माण झालेल्या सिंचनाच्या प्रश्नाला घेवून शेतकर्‍यांनी महावितरण कंपनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास याहून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला.
तालुक्यातील सोनी परिसरातील नोनीटोला, झांजिया, बोटे, दवडीपार, देवूटोला येथील शेतकर्‍यांपुढे विजेचा अनियंत्रित पुरवठ्याला घेवून रब्बी पिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात सिंचनाची सोय असली तरी ८ तास विज पुरवठा करीत असल्याचा ऊहापोह करणारी महावितरण कंपनी दिशाभूल करीत आहे. त्यातही रात्रपाळीत पुरवठा केला जातो. यामुळे शेतकर्‍यांना सिंचन कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच अनेक शेतकर्‍यांचे विज कनेक्शन प्रलंबित आहेत. आदि समस्यांना घेवून आज (ता.१६) महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान विद्युत पुरवठा २४ तास करावा, या प्रमुख मागणीला घेऊन शेतकर्‍यांनी महावितरण कंपनी कार्यालयासमोर जय जवान, जय किसान अशी घोषणाबाजी करून अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. दरम्यान मागणीची पुर्तता करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले. त्यातही जर मागण्यांची पुर्तता झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.