गोंदिया : परराज्यातून येणाऱ्या धान्यांनी भरलेल्या ट्रकवर कारवाई, ३२ लाखांचा माल जप्त GONDIA GRAIN TRUCK SIZED

Share This News

गोंदिया, ०२ जानेवारी : मध्य प्रदेश, बिहार राज्यातून गोंदिया जिल्ह्यात धान्य घेऊन येणारे सहा ट्रक नवेगावबांध पोलिसांनी पकडले असून याची किंमत ३२ लाख रुपये इतकी आहे. महाराष्ट्र सरकारने धानावर  प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. या  तुलनेत इतर राज्यात बोनस दिला जात नाही. त्यासाठी काही व्यापारी शासनाचा बोनस लाटण्यासाठी इतर राज्यातून कमी दरात धान्य खरेदी करून जिल्ह्यातील आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर विक्री करत आहे.

या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परराज्यातून येणाऱ्या धान्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तरी सुद्धा इतर राज्यातून धान्य येणे बंद झाले नसले तरी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून परराज्यातून येणाऱ्या ट्रकची तपासणी करत कारवाई करताना पाहायला मिळत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.