बाहेरील राज्यातील रुग्णांनामुळे गोंदियातील कोरोना बळींमध्ये सर्वाधिक : वडेट्टीवार

Share This News

गोंदिया : कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हे सर्व रुग्ण केवळ गोंदियातील नसून बाहेरच्या राज्यातील आहेत, असं सांगतानाच गोंदियात उपचार घेण्यासाठी बाहेरच्या राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत आहेत, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
गोंदियातील वैद्यकिय महाविद्यालयात 29 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र हे वृत्त खोटे असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. स्वत: विजय वडेट्टीवार यांनी गोंदियातील 29 मृतांमध्ये बाहेरील राज्यातील लोकांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे.

मध्य प्रदेशचा ताण

गोंदियात लगत असलेल्या मध्यप्रदेशातून कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचारासाठी गोंदियात येतात. खासगी रुग्णालये गंभीर रुग्णांना भरती करून घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे. गंभीर आजारी असलेले रुग्ण रुग्णालयात उशिराने उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना वाचवणे कठिण जाते, असं वडेट्टीवार म्हणाले.

ऑक्सिजनमुळेच मृत्यू : नातेवाईक

गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनसाठी मोठी धावपळ करावी लागली होती. कारण रुग्णालयातील ऑक्सिजनच संपल्याने ऑक्सिजनसाठी रुग्ण तळफडू लागली होती. रुग्णाचे नातेवाईक ऑक्सिजनसाठी टाहो करीत होते. तब्बल अर्धा तास ऑक्सिजनचा पुरवठा बंद असल्याने ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले आहेत, असं मृत कोरोनाबाधित महिलेचा भाऊ खेमचंद लांजेवार यांनी सांगितलं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.