गोंदियाा : लॉकडाऊनमुळे प्रवासी मजुरांची पायपीट

Share This News

गोंदिया, 19 एप्रिल : राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून प्रवासी मजुरांनी आपापल्या गावची वाट धरली आहे. या मिनी-लॉकडाऊनमध्ये गोंदियातून शेजारी राज्यांना जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्यात. त्यामुळे या मजुरांना पायपीट करत त्यांच्या गंतव्याला जावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. गोंदियातून मध्यप्रदेश आणि छत्तीसगढला जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्याने शेकडो नागरीकांनी आपल्या गावी जाण्यासाठी पायी प्रवास सुरू केल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. गोंदियातून हे नागरीक 500 किलोमीटरचा पायी प्रवास लहान मुले वृद्धासह करणार आहेत. आपण लाँकडाऊन 1 मध्ये लाखो मजुरांना पायी – पायी आपले गाव गाठायची पाळी आल्याचे पाहिले आहे, तर अनेक मजूरांचा अन्न पाण्याविना जीव गेला मात्र त्याच पाश्वभूमीवर आज ला़कडाऊन 2 मध्ये पहील्यांदाच अनेक मजूर गोंदियातून 500 कीलोमीटरचा प्रवास पायी करीत आहेत. हे मजूर मध्यप्रदेश येथील मलाजखंड येथे जाण्यासाठी निघाले असुन जवळपास त्यांना मलाजखंड जाण्यासाठी 10 दिवस लागणार असल्याचे हे मजूर सांगत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.