गोंदिया : जन्मदात्या पित्यानेच आपल्या दीड वर्षाच्या मुलीची दारावर आपटून केली हत्या
गोंदिया, ०४ फेब्रुवारी, : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या लोणारा गावात एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या दीड वर्षाच्या मुलीची दारावर आपटून हत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. तिरोडा तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे.आई – वडील आपल्या पोटच्या लेकाला जिवापाळ प्रेम करीत असतात. मात्र, तिरोडा तालुक्यातील लोणारा गावातील क्रूर पित्यानेच फक्त ५ रुपयांसाठी मुलीचा जीव घेतला आहे. लोणारा गावातील २८ वर्षीय विवेक उईके हा तरुण संध्याकाळी कामावरून परत आला असताना त्याची दीड वर्षाची मुलगी वैष्णवी रडत होती. पत्नीने मुलीला खाऊ घेऊन देण्या करिता विवेककडे पाच रुपये मागितले होते. मात्र, विवेकने रागाच्या भरात मुलीला उचलत घरातील दारावर आपटले. वैष्णवीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिला रुग्णालयात नेले असता डॉक्तरांनी वैष्णवीला मृत घोषित केले आहे.वर्षा व विवेक याचे लग्न २०१८ ला झाले असून वैष्णवी हि त्यांची एकुलती एक मुलगी असताना या निर्दयी पित्याने या चिमुकलीवर थोडीशी दया न दाखवता रागाच्या भरात चिमुरडीला जामिनावर आपटले. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. तर, मृत मुलीच्या आईने या संदर्भात तिरोडा पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी वडील विवेक उईके याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखत केला आहे. आयुष्यात पैसा कितीतरी येतो व जातो मात्र स्वतःच्या मुलीला ५ रुपये मागितले म्हणून पित्याने तिचा जीव घेतला त्यामुळे अशा विकृत मानसिकतेच्या पित्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशीच मागणी केली जात आहे.