गोंदिया : कुशाग्र श्रीवास्तव जिल्ह्यातील पहिले सैन्य अधिकारी

Share This News

गोंदिया : तालुक्यातील कामठा येथील कुशाग्र श्रीवास्तव याने नेशनल डिफेन्स अॅकेडमी परीक्षेत यश प्राप्त केले असून तो जिल्ह्यातील पहिला सैन्य अधिकारी ठरला आहे.युपीएससीद्वारे दरवर्षी सैन्य अधिकाऱ्यांच्या पदाकरिता परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेत गोंदिया तालुक्यातील कामठा येथील कुशाग्र किशोर श्रीवास्तव याने यश प्राप्त केले आहे. तसेच बैंगलोर येथे दहा दिवसीय हाई प्रोफाईल इंटरव्यूमध्ये उत्तीर्ण होवून तो गोंदिया जिल्ह्यातील पहिला सैन्य अधिकारी ठरला आहे. कुशाग्र श्रीवास्तव याने आपल्या यशाचे श्रेय वडिल किशोर श्रीवास्तव, काका सुरेश श्रीवास्तव व कुटुंबियांना दिले. कुशाग्रने जिल्ह्याचे नाव लौकीक केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.