गोंदिया : रेल्वेच्या धडकेत दोन ३ वर्षीय अस्वलांचा मृत्यू Gondia: Two 3-year-old bears die in train collision

Share This News

गोंदिया:– हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे जंक्शन जवळील असलेल्या गंगाझरी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर रेल्वेगाडीच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना  आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या दोन्ही अस्वलांची वय अंदाजे ३ वर्ष सांगितले गेले.या आधी याच रेल्वे मार्गावर एका बिबट्याचा देखील रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेला होता. सदर रेल्वेमार्गाच्या दोन्हीबाजूला जंगल असून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प लागून आहे.आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास या रेल्वेमार्गावरुन जेव्हा गिताजंली एक्सप्रेस रेल्वे जात असताना अचानक इंजिनच्या समोर दोन अस्वल आले.रेल्वेइंजिनसमोर अस्वल आल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर यासंदर्भात माहिती दिली.गोंदिया रेल्वेस्थानकाच्या अधिकार्यानीही लगेच वनविभागाला याबाबत माहिती दिली.माहिती मिळताच गोंदिया वनविभागाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असता दोन अस्वलांचा रेल्वेगाडी खाली येऊन मृत्यू झाल्याचे बघावयास मिळाले.यामध्ये धडकेत एका अस्वलाच्या डोक्याला व तोंडाला मार लागला.दुसऱ्या अस्वलाच्या पोटाला मारा लागल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने दर्शविला आहे. दोन्ही अस्वलांचे वय जवळ पास ३ वर्ष असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यानी सांगितले. घटनस्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृत अस्वलांना गंगाझरी येथील क्षेत्र सहाय्यक वनविभाग कार्यालयात पाठवून उत्तरीय तपासणी करण्यात आली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.