गोंदिया : शासकीय भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणारे चित्र काढून शहराला नवी ओळख

Share This News

गोंदिया, २५ डिसेंबर : गोंदिया नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमण काढून रस्त्याच्या बाजूला असलेल्या शासकीय भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणारे चित्र काढून शहराला एक नवीन ओळख दिली आहे. गोंदिया शहरातील शासकीय भिंती आता बोलक्या झाल्या असून लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मागील एका महिन्यापासून गोंदिया नगर परिषदेने शहरातील अतिक्रमण काढायला सुरवात केली आहे. शहराच्या विविध शासकीय इमारती समोरील भिंती मोकळ्या झाल्या असून स्वच्छ भारत तसेच वसुंधरा अभियान अंतर्गत या भिंती रंगविण्यात येत आहेत.

स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ पाणी वाचवा पाणी जिरवा  सोबतच गोंदिया जिल्हा हा गोंड राज्याचा जिल्हा असल्याने जिल्ह्याची संस्कृती दर्शविणाऱ्या वारली पेंटींग देखील भिंतीवर काढण्यात आल्या आहेत. या भिंती रस्त्यावरून जाणाऱ्या येणा-या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर, सध्या देशात कोरोनाने थैमान घातला  असून कोरोनापासून स्वतः चे बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे, तोंडावर कापडी रुमाल किंवा मास्क बांधणे हेच उपाय आहेत, याचे संदेश देखील नगर परिषदेच्या वतीने चित्राच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. गोंदिया शहरातील मोकाट भिंती आता रंगमय झाल्याने शहराला एक वेगळी ओळख मिळत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.