देशात यंदा चांगल्या मान्सूनचा अंदाज – स्कायमेट

Share This News

देशावर कोरोना संकटाचे सावट असताना एक दिलासा दायक बातमी गुढी पाडव्याच्या मूहुर्तावर समोर आली आहे. देशात यंदा चांगल्या मान्सूनचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. देशात यंदा सरासरीच्या १0३ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. यात ५ टक्के कमी वा अधिक होऊ शकतात. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. स्कायमेटचे अध्यक्ष जी पी शर्मा यांनी याविषयीची माहिती दिली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा देशात मान्सून सामान्य राहिल. यंदा दुष्काळाची शक्यता शून्य टक्के इतकी आहे. तर एकूण मान्सून कालावधीत सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमानाची शक्यता ६0 टक्के असल्याने पाऊस चांगलाच राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी जूनमध्ये सरासरीच्या १0६ टक्के पर्जन्यमानाचा, जुलैमध्ये सरासरीच्या ९७ टक्के पर्जन्यमानाचा, ऑगस्टमध्ये सरासरीच्या ९९ टक्के पर्जन्यमानाचा, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ११६ टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.