गूडन्यूज..रेमडेसिवीरचे चार हजार इंजेक्शन्स नागपुरात पोहचले

Share This News

नागपूरः उपराजधानी नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले प्रयत्न फळाला आला असून चार हजार इंजेक्शनचा साठा नागपुरात पोहोचला आहे.
नागपुरात इंजेक्शन्सचा तुटवडा व काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यावर गडकरी यांनी या इंजेक्शन्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रंजनीश बोमजाई यांच्याशी संपर्क साधून त्यांना इंजेक्शन्सचा साठा पाठविण्याची विनंती केली होती. ती त्यांनी तात्काळ मान्य केली होती. मायलन इंडिया ने तात्काळ चार हजार इंजेक्शन्स नागपुरात पोहोचते केले आहेत. या इंजेक्शन्सची दुसरी खेप लवकरच पाठविली जाणार असल्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. मायलन इंडीया ही रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे .यापूर्वी गडकरी यांनी ‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी बोलणे केले होते. ‘सन फार्मा’ मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोसचा पुरवठा नागपुरात झाला आहे. आणि उर्वरित डोसेज लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.