शासकीय कर्मचारी म्हणे घोडा बांधू द्या, नंतर मागितली माफी Government employees say let the horse tie, then apologize

Share This News

नांदेड : रोजगार हमी योजनेचा विभागात कार्यरत सहायक लेखाधिकारी सतीश पंजाब देशमुख यांनी घोडा घेण्याची व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्याची परवानगी मागणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. हे पत्र सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सतीश यांचा चांगलाच समज दिला. त्यामुळे सतीश यांनी याप्रकरणी माफीनामा सादर केला आहे.
पाठीच्या कण्याचा त्रास असल्याने घोडा घेण्याची व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्याची परवानगी मागणारे पत्र सतीश यांनी ३ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना दिले. हे पत्र सोशल माध्यमांवर व्हायरल झाले. राज्यभर याची चर्चा सुरू झाली. अशा प्रकारची विनंती करणाऱ्या पत्राबाबतच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी देखील दुजोरा दिला. सतीश देशमुख यांच्या मागणीवर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागविला गेला. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला. त्यामुळे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सतीश यांना समज दिली. अखेर सतीश देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.