विद्यापीठांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप Government interference in the work of universities

Share This News

आमदार प्रवीण दटके यांचा आरोप

मुंबई : राज्यातील विद्यापीठांच्या कामात राज्य सरकार अनावश्यक हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केली. विधान सभेत या मुद्द्यावर ते बोलत होते.
विदर्भातील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठासह अनेक विद्यापीठांमध्ये सरकार अनावश्यक हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यापीठांचे प्रश्न सोडविण्याच्या नावाखाली विद्यापीठांच्या खर्चाने नेते व मंत्री जनता दरबार भरवित आहेत. अशाच राजकीय दबावामुळे जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अनपेक्षितपणे राजीनामा दिला आहे, असा आरोप दटके यांनी केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियुक्ती करतानाही सरकारने आततायीपणा केल्याचा आरोप औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार दटके यांनी केला. सरकारने विद्यापीठांमध्ये हस्तक्षेप बंद न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.