मुख्य सचिवासाठी सीताराम कुंटेंना सरकारची पसंती | Government prefers Sitaram Kunte for Chief Secretary

Share This News

नागपूर : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा कार्यकाळ संपत असल्याने या पदावर नियुक्तीसाठी दोन नावे ज्येष्ठतेनुसार चर्चेत आहे. सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी ही ती दोन नाव आहेत. परदेशींच्या नावाला राज्य सरकारचा विशेषत: शिवसेनेतून विरोध असल्याचे सीताराम कुंटे यांचे राज्याचे मुख्य सचिव पारडे सध्यातरी जड आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात प्रवीण परदेशी हे त्यांचे अप्पर प्रधान सचिव होते. त्यामुळे परदेशी यांनी फडणवीसांच्या कार्यकाळात केलेल्या कामांमुळे शिवसेना त्यांच्यावर चांगलीच नाराज आहे. याशिवाय बृहन्मुंबई महापालिका आयुक्त असताना कोरोना काळात परदेशी यांची घेतलेल्या निर्णयांमुळे शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची तातडीने बदली करून घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्यानेच परदेशी यांच्या नावाला शिवसेना विरोध करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे निवृत्तीनंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाची सूत्रे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुळकर्णी हे चार जानेवारीला निवृत्त झालेत. तेव्हापासून ते पद रिक्त आहे.

कोण आहेत कुंटे?
१९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सीताराम कुंटे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून गृह विभागात कार्यरत आहेत. कुंटे नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे ते मुख्य सचिव झाल्यास त्यांना केवळ ९ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी, मुंबई पालिकेचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, मनपा आयुक्त, गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

हे आहेत प्रवीण परदेशी
१९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले प्रवीण परदेशी यांनी १९९३मध्ये लातूरमध्ये झालेल्या भूकंपात जिल्हाधिकारी म्हणून मोलाची कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे ते आयुक्तही होते. गुजरातमध्येही त्यांनी काम केले आहे. अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून काम केल्यानंतर २०१४मध्ये ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर प्रधान सचिव व सर्वांत विश्वासू अधिकारी बनले. २०१९मध्ये त्यांची नियुक्त मुंबई मनपा आयुक्त पदावर करण्यात आली. त्यानंतर ते दिल्ली येथे प्रतिनियुक्तीवर गेले होते. मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत असल्याने ते आता महाराष्ट्र सरकारच्या सेवेत परतण्याच्या तयारीत आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.