नागपूर महापालिकेनं शहरवासियांना मोठा दिलासा दिला

Share This News

नागपूर: महापालिकेनं शहरवासियांना मोठा दिलासा दिला आहे. नागपूरकरांच्या पाण्यावरील विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. महापालिकेनं दोन दिवसांपूर्वीच मालमत्ता करासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता पाणीपट्टी थकबाकीदारांसाठीही अभय योजना लागू केली आहे. 212 कोटी रुपयांच्या थकीत पाणीकराच्या वसूलीसाठी महापालिकेनं ही योजना राबवली आहे. 21 डिसेंबर ते 22 फेब्रुवारी दरम्यान ही योजना राबवली जाणार आहे. तोपर्यंत शहरवासियांना योजनेचा फायदा घेत पाणीपट्टी भरली नाही तर मात्र 22 फेब्रुवारीनंतर महापालिका नळ जोडणी तोडण्याची मोहीम हाती घेणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.