कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनच्या आपातकालिन वापरास परवानगी green signal to covishild and co vaccine’s emergency use

Share This News

नवी दिल्ली, 03 जानेवारी : भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. डीसीजीआयने दिलेल्या माहितीनुसार सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. भारतात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. शनिवारी व्हॅक्सिनचा ड्राय रनही पार पडला. त्यानंतर दोन्ही लसींच्या आपात्कालिन वापराला संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. 

वापरासाठी परवानगी दिली आहे. 

शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयने म्हटले आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी  असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असे व्हीजी सोमाणी यांनी म्हटले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.