राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे अभिवादन

Share This News

नागपूर, ता.३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३ व्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर श्री. दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी व्हेरायटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले. तसेच हुतात्मा स्मारक सुभाष रोड, बालोदयान येथे नगरीतर्फे पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यात आले. तसेच चितार ओळी, जुनी शुक्रवारी, सतरंजीपूरा, गंजीपेठ, सदर चौक स्थित गांधीजींच्या प्रतिमेला महापौर यांनी पुष्पहार अर्पण केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.