गुजरात एटीएसने केली दाऊदच्या गुंडाला अटक

Share This News

गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड माजीद कुट्टी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. माजीद कुट्टी हा गेल्या 24 वर्षांपासून फरार होता. माजीद भारतात येताच एटीएसने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. माजीद हा दाऊद इब्राहिमचा खास समजला जातो. यासंदर्भातील माहितीनुसार गुजरातच्या मेहसाणा येथील दूधसागर डेअरीजवळील बॉम्बे गेस्ट हाऊसवर 23 फेब्रुवारी 1996 रोजी करण्यात आलेल्या छापेमारीत आरडीएक्स आणि मोठा शस्त्रसाठा सापडला होता. या छापेमारीनंतर माजीद फरार झाला होता. या छापेमारीत 4 किलो आरडीएस, 115 पिस्तुले, 750 हून जास्त कार्ट्रिज, 10 डेटोनेटर जप्त करण्या आले होते. धक्कादायक म्हणजे जप्त करण्यात आलेले पिस्तुसे आणि बुलेट्स हे पाकिस्तानी बनावटीचे होते. शस्त्रसाठी राजस्थानच्या बाडमेर आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आला होता. मुंबई आणि अहमदाबादेत हा शस्त्रसाठा पाठवला जाणार होता. मात्र, त्याआधीच ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर माजीद कुट्टी मलेशियाला पळून गेला होता. तो गेल्या 24 वर्षांपासून मलेशियातच होता. मात्र, माजीद पुन्हा भारतात येत असल्याची गोपनिय माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला केली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गुजरात एटीएसनं दाऊदचा खास पंटर बाबू सोलंकी याला अटक केली होती. सोलंकी हा देखील गेल्या 14 वर्षांपासून फरार होता. त्याला दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जात होता.एटीएसच्या सूत्रांनुसार बाबू सोलंकी 2006 च्या एका गँगवॉरच्या केसमधील मोस्ट वॉन्टेड आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.