बुलडाणा, वर्धा, मेळघाटात गारपीट

Share This News

नागपूर : विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बुलडाणा, वर्धा, मेळघाट येथे गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, सिंदखेडराजा, लोणार तालुक्यातील काही गावात गारपीट झाली. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोद, काटेल, कोलद, लाडणापूर, वसाडी, टुनकी, वरवट बकाल, सिंदखेडराजा तालुक्यात मलकापूर पांगरा, देऊळगाव काळे, लोणार तालुक्यात बीबी, चोर पांगरा, गोवर्धन परिसरात गारपीट झाली. गारपिटीमुळे गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. सिंदखेडराजा तालुक्यात काही ठिकाणी झाडे कोसळली.
वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील रोहणी, विजयगोपाल, मालातपूर, शिरपूर परिसरात गारपीट झाली. तर सेलू व समुद्रपूर तालुक्याच्या काही भागात गारांचा पाऊस झाला आहे. गारपिटीने चणा आणि गहू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागातही विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. मेळघाट झालेल्या गारपीटीमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.