‘हॅरी पॉटर’ फेम पॉल रिटर यांचे निधन

Share This News

लंडन : हॅरी पॉटर चित्रपटाच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारलेले तसेच चर्नोबिल या वेबसीरीजमधील बहुगुणी ब्रिटीश अभिनेते पॉल रिटर यांचे निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते आणि ब्रेन ट्युमर या आजाराशी झुंज देत होते. ते ब्रिटीश दूरचित्रवाणीचा सुप्रसिद्ध चेहरा होते. त्यांनी फ्रायडे नाईट डिनर या मालिकेत मार्टिन गुडमन ही लंडनमधल्या एका ज्यू परिवारातल्या कुटुंबप्रमुखाची, वडिलांची भूमिका साकारली होती. चर्नोबिल या वेबसीरीजमध्ये त्यांनी अणु ऊर्जा प्रकल्पावरच्या एका इंजिनीयरची भूमिका साकारली होती. ह्यहॅरी पॉटर एँड हाफ ब्लड प्रिन्स या चित्रपटात पॉल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर क्वांटम ऑफ सोलेस या बाँडपटातही त्यांनी काम केले होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.