उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची मागणी

Share This News

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

मुंबईः  हाथरसमध्ये तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर देशात सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. या घटनेवरून काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर निशाण साधला आहे.  

उत्तर प्रदेशमधील हाथसरयेथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. काल, या तरुणीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेला न्याय मिळावा यासाठी

कोंग्रेस  आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना काँग्रेस नेते सचिन सावंत  यांनी सणसणीत टोला हाणला आहे.

न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का? हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप


‘भारतमातेच्या एका मुलीवर बलात्कारकरून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर १० दिवसांनंतरही तक्रार दाखल करून घेतली नाही. तिला दिल्लीतील रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर केला आणि तिच्यावर पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केले. याला जंगलराज म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती शासन लागू करा,’ अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.