हाथरस घटनेचे अमेरिकेत उमटले पडसाद; अनिवासी भारतीयांची निदर्शने

Share This News

Hathras case: अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरसह इतर अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. यावेळी पीडितेला न्याय द्यावा, दोषींवर कारवाई आदी मागण्यात करण्यात आल्या.

न्यूयॉर्क: उत्तर प्रदेशमधील घडलेल्या हाथरस अत्याचार प्रकरणात देशातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. हाथरस येथील घटनेचा देशभरातून निषेध होत असताना आता अमेरिकेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी या घटनेविरोधात निदर्शने केली. हाथरस येथील घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे निदर्शकांनी म्हटले.
अनिवासी भारतीयांचा समावेश असलेल्या ‘आंबेडकराइट मिशन’च्या नेतृत्वाखाली न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेन्सिलविया आणि मिशिगन या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. त्याशिवाय सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरआणि संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, पीडितेला न्याय द्यावा, पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, दोषी पोलिसांवर कारवाई करावी, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करण्यात यावी आदी मागण्यात करण्यात आल्या.
अमेरिकेत करोना महासाथीच्या आजाराचा उद्रेक सुरू असतानाही हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी सुरक्षित अंतर राखण्यात आले होते. अमेरिकेतील आंदोलनात मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय सहभाग घेतला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.