भूकेचं संकटही गंभीर

Share This News

येत्या काळात कमान २६ कोटी पन्नास लाख लोकांना अन्नाच्या टंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे.

जगभरात कोरोनाचं संकट गंभीर झालं असताना भूकेचं संकटही गंभीर झालं आहे. येत्या काळात कमान २६ कोटी पन्नास लाख लोकांना अन्नाच्या टंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे कोणतेही पुरस्कार जाहीरपणे दिले जात नाहीत. सामाजिक आणि राजकीय सभांना परवानगी नाही. गर्दी जमवण्यास मनाई आहे. अशा वेळी जगभरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला जाहीर करण्यात आला. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सुमारे ३१८ जण स्पर्धेत होते. युद्ध-संघर्षग्रस्त भागातल्या शांततेसाठी, परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’नं मोलाची कामगिरी बजावल्याचं नोबेल पुरस्कार समितीनं म्हटलं आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातल्या विविध देशांमधून निधी दिला जातो. ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने २0१९ मध्ये ८८ देशांमधल्या जवळपास दहा कोटी नागरिकांपर्यंत खाद्यान्न पाठवलं. जगभरातली उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्य सुरक्षततेला प्रोत्साहन देणारी ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ ही सर्वात मोठी संघटना आहे. नॉर्वेच्या नोबेल कमिटीच्या अध्यक्ष बेरिट राइस अँडरसन यांनी नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की २0१९ मध्ये ८८ देशांच्या ९.७ कोटी लोकांना वर्ल्ड फूड प्रोग्रामची मदत झाली आहे. कोरोना काळात जगभरातील गरजूंना मदत करण्यात या संस्थेनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.