आरोग्यमंत्री राजेश टोपे,जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

Share This News

मुंबई, दि.19-राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे अशी माहिती त्यांनी स्वतः टविट करुन आता दिली आहे. त्यांनी सांगितले मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. तरीही जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी काळजी घेवून लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. तुमच्या आशिर्वादाने लवकरच कोरोनाला हरवून आपल्या सेवेत रुजू होईल असा व्टिट पाटील व टोपेंनी केला आहे. दोन दिवस अगोदर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी ते आले होते यावेळी पत्रकारांशी सुध्दा त्यांनी संवाद साधला होता. त्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली जात आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.