आरोग्यम् धनसंपदा काय खायचे, काय नाही?

Share This News

डॉ. अमोल हातेकर

बरेच दिवसानंतर आज लग्न साम्भाराम्भात जाण्याचा योग आला.कार्यक्रमात असणारी सर्व लोक जेवणाची खूप प्रशंसा करीत होते.आम्ही नवीन जोडप्यांना आशीर्वाद देऊन जेवणाची व्यवस्था असणाऱ्या स्टोल कडे वळलो .पाहिच्याच स्टोल वर होते टमाटर चे सूप आणि त्यावर बेतानी टाकलेली साय . आंबट आणि साय एकत्र? हे काय प्रकार आहे हे तर विरुद्धान्न आहे आणि लोक किती चवीने याचे प्राशन करतात कि याचे ! पुढच्या स्टोल वर चायनीज चे विविध पदार्थ ठेवलेले होते जे मला कधी खाणे शक्य झाले नाही कारण त्यामध्ये माहिती नाही किती तरी असे मसाल्याचे विविध
पदार्थ, भाज्या, सॉसेस, साखर, मीठ ,व्हिनेगर,अजिनीमोटो असे किती तरी घटक तो भसाभसा एकत्र करून घातलेले असतात.हे सुद्धा एक विरुद्धान्न कि.मेन कोर्स मध्ये होती मलाई –मेथी मटार ची भाजी आणि साय घातलेली बटर पनीर ची भाजी.दुधात मीठ मेथी ची भाजी टाकून हा कसला पदार्थ तयार केला कि त्या आचार्यांनी .एवडे विरुद्धान्न कमी नाह्वते वाटते तर स्वीट डिश अजून त्यात भर देणारी होती ते म्हणजे फ्रुट कस्टर्रड.दुध आणि फळे एकत्र .अरे राम काय म्हणव आणि काय खाव अस झाल होत शेवटी वरण भात यावर आपली भूक भागवावी लागली आणि घरी यावे लागले.घरी आले तेह्वा मनात सतत विचार घोसालायला लागला कि लोक अज्ञानामुले म्हणा किंवा जिभेचे चोचले पुर्राविण्यासाठी घटक अश्या विषाचे सेवन दररोज करत आहे आणि आयुर्वेदाचा प्रतिनिधी म्हणून आपण काही तरी या बाबत करणे गरजे४चे आहे असे ठरविले आणि आज या लेखाला सुरुवात केली.                                                                                                                                                
 हॉटेलमध्ये गेल्यावर नवीन काही खायचे असे वेढ असते,तसेच हॉटेलमध्ये असणारे आचारी म्हणजे शेफ हे सुद्धा कश्यात हि काही तरी घालून अगदी कालवण प्रमाणे पदार्थ तयार करीत असतात .आज घरातली गृहणी पण यात कसल्याही प्रकारे मागे राहिली नाही ती पण टी व्ही वरील मालिका पाहून असलीच काही तरी रेसिपी बनवत असते कारण आमच्या मुलांना हेच आवडत असते आपल्या पिढीला पोषक आहार देणे तर दूरचे ठरले पण विरुद्ध आहार रुपी मंद विष जरूर देत आहो याची कल्पना सुद्धा आपणास नसते.आज आपल्या मुलांना पुरण पोळी,उकडी चे मोदक,लवटा ची भाजी,उकरपेंडी ,पुडाची वाडी हे प्रकार आवडणे तर दूर यांची नावे सुद्धा माहिती नसतात.पण अगदी नर्सरीत जाणारे बाळ  सुद्धा चायनीज आणि कॅन्टीनेन्टल फूड हव असत आहार बनविता येणे हे सोपे पण आहार बनविताना आहाराचे काही नियम पाळणे खूप गरजे चे असते.अन्यथा असा आहार शरीर निर्माण करणारा नाही तर शरीर नष्ट करणारा अवश्य ठरेल . कशातही काहीही मिसळायचं? गार/ गरम कसेही संस्कार करायचे? हे अगदी चूकीचे आहे.आजकाल लोकांना खाण्याच्या पदार्थामध्ये सतत वैविध्य हवं असतं.मग तयार केलेला किती हि विरुद्ध असो किंवा कुठल्याही पद्धती ने केलेला असो त्याचा लोकांना फाकर पडत नसतो. ‘विरुद्धाहार’ ही आयुर्वेदातील अत्यंत वेगळी संकल्पना न आहे .जो आहार पचन न झाल्यामुळे झाल्यामुळे शरीरातील वात –पित्त आणि कफ दोषांना वाढवितो तसेच रस-रक्तादी धातूंच्या विपरीत गुणाचे आहे ,जो मंद विषाप्रमाणे शरीरातच साठून राहतो आणि शरीराबाहेर फेकल्या जात नाही आणि शरीराला विविध मार्गाने त्रास देतो,आणि ज्याच्या सेवनाने रोगाची निर्मितीहोते तो ‘विरुद्ध आहार’- अशी व्याख्या सुश्रुताचार्यानी केली आहे.लहान मुला मध्ये थोडे जरी अपचन झाले कि त्यांना उलटी किंवा जुलाब होऊन शरीरातील अपचीत पदार्थ बाहेर टाकल्या जाते .पण मोठ्या मध्ये असे घडत नाही .

आणि परिणामी जेह्वा जेह्वा अपचन होते तेह्वा तेह्वा शरीरात अपचीतजण्य मंद विष शरीरात साठायला लागतो आणि याची परिणीती होते एका मोठ्या आजारात. यामुळे जे आजार निर्माण होतात हे कष्टसाध्य किंवा असाध्य ठरणारे असतात म्हणजे झालेले आजार एक तर बरे होत नाही किंवा बरे होण्यास खूप तडजोडीचे प्रयत्न अरावे लागतात .. सातत्यानं ‘विरुद्ध आहार’ खाणाऱ्या व्यक्तींना
नपुंसकत्व, जलोदर, ग्रहणी, विविध त्वचाविकार, सूज, सांधेदुखी, भगंदर, पोटाचे विविध विकार ,पांढरे डाग,श्वास, रक्तदुष्टिजन्य आजार, मनाचे आजार, ज्ञानेन्द्रीयाची विकृती ,काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर असे दुर्धर रोग होण्याची दाट

शक्यता असते. याखेरीज अष्टौमहागद म्हणजे आठ प्रकारच्या असाध्य व्याधी या विरुद्ध आहाराच्या सेवनाने होत असतात.आपण किती तरी माध्यमाद्वारे विरुद्ध आहार घेत असतो. ह्या मुले आजार जरी आज उद्भवत नसेल तरी काही काळाने नक्कीच होणारे असते आणि याची माहिती आपल्याला वैद्य कडे गेल्या खेरीज मिळत नाही. आयुर्वेदात विरुद्ध आहाराचे १८ प्रकारचे संयोग सांगितले आहे.

१.देश विरुद्ध -राजी हि मुलाची पंजाब मधली पण लग्न झाल्यावर ती नागपूर ला आली .तिथे तिच्या जेवणात मक्क्याचे पदार्थ ,सरसो का साग ,सरोसो च्या तेलात बनविलेले भाजी नेहमीच असायचे.पण आता नागपूर ला आल्यावर तिने असाच आहार सुरु ठेवल्याने तिला भयंकरअम्लपित्ताचा त्रास होऊ लागला. कारण पंजाब हे मुळत: थंड प्रदेश म्हणून तिथे लोकांना मक्का ,सरसो
यासार्ख्ये उष्ण पदार्थ पचणारे आणि फायदेशीर ठरणारे असतात पण आपला विदर्भ म्हणजे उष्णतेची खान या ठिकाणी उष्ण पदार्थ कसे जमणार ? थोडक्यात उष्ण भागात उष्ण आणि थंड प्रदेशात थंड अन्न हे आहे देश विरुद्ध.याशिवाय ज्या भागी जे पिकते तेच खायला हवे.जसे कोकणात तांदूळ ,महाराष्ट्रात ज्वारी,पंजाबात मक्का ,मध्यप्रदेशात गहू इत्यादी.

२.काल विरुद्ध -आज काळ लोकांना काय फड असत काय ठाऊक.घराजवळील रश्मीचे नुकतेच लग्न झाले होते आणि ती आपल्या नवऱ्यासोबत फिरायला गेली तेही थंड प्रदेशात कुल्लू आणि मानली.त्यातला त्यात तिथे आम्ही रोज आईस्क्रीम खाल्ले क्युंकी ‘थंडी मी आईस्क्रीम खाणे का मजा हि कुछ अलग होता है .’ असे तिच्या नवऱ्याचे मत .आता काय दोघांना प्रचंड सर्दी आणि
खोकला.आणि या प्रकारालाच म्हणजे शीत काळात शीत आणि उष्ण काळात उष्ण पदार्थाचे सेवन करणे म्हणजे काल –विरुद्ध आहार.शिवाय आज १२ हि महिने आंबे,सीताफळ ,टरबूज अशी फळे मिळत असतात .पण हि फळे पाहिजे त्या ऋतूत च घेतली पाहिजे. अकाली फळे खाणे हाही एक काल विरुद्ध आहाराचाच प्रकार आहे.

३.अग्नी विरुद्ध –जेह्वा कडकडून भूक लागते तेह्वाच जेवण करावे असा आयुर्वेदाचा नियम.पण आज शाळा,नोकरी व्यवसाय या सर्वांमुळे दोन वेळच्या जेवणाला सुद्धा बरोबर वेळ मिळत नाही .माझ्या क्लिनिकला येणारे एक सिंधी कुटुंबातील प्रत्येकाला पोटाची कुठली न कुठली तक्रार होती कारण जेवणाची अस्थिर वेळ.त्यातील वडील-मुलगा आणि भाऊ यांचे प्रत्येकाचे वेगळे दुकान
आणि दुकानात ग्राहकी एवढी असते कि सकाळचे जेवण कधी दुपारच्य ४ ला तर कधी ५ होते जेवणाची वेळ पूर्ण निघालेली असते आणि भूक पण त्यावेळी नसते तरी पण जेवण करावे म्हणून हि मंडळी करतात.घराच्या बाजूला राहणारी सवी तर एखाद्या उपनिषदातील ब्राह्मणाला मागे ठेवणारी .आठवड्यातील ७ दिवसापैकी ६ दिवस तर आमचे कुठले न कुठले उपासाच चालत
असतात आणि आह्मी आमची उपास मारी करत असतो.हा सगळा प्रकार मोडतो अग्नी विरुद्ध या गटात .म्हणजे भूक नसताना जेवण घेणे,किंवा कडकडून भूक लागली तरी उपासमारी करून घेणे,हा सर्व प्रकार म्हणजे अग्नी विरुद्ध.

४.मात्रा विरुद्ध-माझ्या मावशी चा मुलगा अविनाश .हा खाण्याचा अत्यंत रसिक आहे केवळ पंधरा वर्षाचा पण जेवणावर जेह्वा बसतो तेव्हा एखाद्या प्रौढ व्यक्तीला हि मागे सोडतो.बाहेर कधी चत खायला गेलो कि एक प्लेट चत नि तर कधीच भागात नाही.त्याला चत सोबत पाणीपुरी,दहीपुरी ,भेल,चाट सामोसा हे सगळेच प्रकार हवे.घरी नानव्हेज केल कि अन्ननलिका भरे पर्यंत
जेवणार मग पोट फुटलं तरी चालेल आम्हाला अशी त्याची गत .आणि निधी त्याची बहिण हि अगदी त्याच्या विपरीत.कारण तिला ‘झिरो फिगर ‘चा नाद आहे म्हणून अगदी दोन घास अश्या ठरून ठेवलेल्या मापतच ती जेवण करीत असते.अन्न हे खूप प्रमाणात खाण किंवा अगदी च कमी खाण ह्या प्रकाराला म्हणतात मात्र विरुद्ध.

५.सात्म्य विरुद्ध- जया हि मुळची पुण्याची .लग्न राहुल सोबत झाल जो कि परदेशात एका नामवंत संगणक कंपनीत मोठ्या पदावर होता. आणि त्याला तिथला ग्रीन कार्ड सुद्धा मिळाला होता. लग्नानंतर जवळ पास एका वर्षानंतर ती परत भारतात आली.तिला पडसाकडे होताना रक्त जाते अशी तिची तक्रार होती. संपूर्ण तपासणी झाली तेह्वा तिला फिशर झाले असे कळले.ती
म्हणाली लग्न अगोदर मला पोटाची अशी काही हि तक्रार नाह्वती पण परदेशात गेल्यावर पोट नियमित साफ होत नसे, मधून मधून मल प्रवृत्ती करताना तीव्र वेदना आणि आग सुद्धा व्हायला लागले आणि आता हा रक्त जाण्याचा त्रास सुरु झाला.मी तिलातिचीब आहार शैली विचारली तेह्वा कळले कि ती तिथे रोज बर्गर ,पिझ्झा ,केक अश्या मैदा युक्त पदार्थाचे सेवन कधी न्याहारीत
तर कधी जेवनात करत होती कारण नवरा हा तिथलाच राहावासी बनला असल्याने त्याला उपमा,पोहे,वरण-भात हा प्रकार आवडतच नसे .पण हि मात्र पूर्णत :भारतीय आणि तिला असले पदार्थ कधी सात्म्य नसल्याने तिला हा त्रास होऊ लागला. अर्थात जे पदार्थ आपल्या सवयीचे नसतात ते आपल्याला पचत नाहीआणि त्यामुळे ते सात्म्य विरुद्ध ठरतात.

६.दोष विरुद्ध –आपले शरीर हे वात-पित्त आणि कफ अश्या तीन दोषांनी बनलेले आहे.शरीरात जर क्यापैकी कुठला हि दोष वाढला असतात त्या दोषाच्या समरूप आहार घेणे म्हणजे ‘दोष विरुद्ध ‘. जसे पित्त वाढले असताना मसाल्याची भाजी किंवा तर्री हि भाजी खाणे,कफाचा त्रास असताना दही खाणे,सांधे दुखी चा त्रास असताना रुक्ष म्हणजे बिना तेलाचा आहार घेणे इत्यादी.

७.संस्कार विरुद्ध- म्हणजे अन्न तयार करताना चुकीच्या पद्धतीचा वापर करणे. अन्न चांगले रुचकर आणि पचायला हलके व्हावे म्हणून आपण अन्नावर विविध संस्कार करत असतो,जसे अन्न शिजवणे म्हणजे अन्नावर अग्नीचा संस्कार ,दही घुसळणे म्हणजे मंथन हा संस्कार,अन्न धन्य स्वच्छ करणे म्हणजे निवडणे हा संस्कार.जसे दही कधी शिजवू नये ,मध कधी शिजवू नये,तांब्याच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवू नये किंवा बनवू नये हे सर्व प्रकार संस्कार विरुद्ध आहेत.याशिवाय आज फळांवर कितीतरी रास्यायानिक घटकांची फवारणी करून ती पिकवली जाते त्यामुळे यातील गुणधर्म सुद्धा बदलतात .आणि अशी फळे खाल्यास आपल्याला अनेक आजार संभवतात .

८.कोष्ठ विरुद्ध –आज बरेच दिवसानंतर जोशी बुवा क्लिनिकला आले.त्यांना मलबद्धतेचा त्रास हा लहान पनापासून आहे याचे कात्रण तपासणीत कळले कि त्यांचा कोठा जड आहे .जोशी बुवा यासाठी क्लिनिक ला येऊन बस्ती हे उपक्रम सुद्धा करत राहतात आता त्यांनी कुठे तरी वाचले आणि त्यांच्या इष्ट मित्रांनी पण त्यांना सुचविले कि मांसाहार न करणाऱ्या व्यक्तींनी प्रथिने मिळावी म्हणून कडधान्य घ्यावे .आणि गेल्या १० दिवसापासून ते नियमित कडधान्य घेत आहे. आता पोट जास्तातच त्रास देत आहे अशी तक्रार घेऊन ते आले.ज्यांचे कोष्ठ हे कडक आहे अश्या व्यक्तींना रुक्षता निर्माण करणारे कडधान्य कसे हो पचणार? अमल्याला जे लवकर पचते तेच आहार घेणे.

९.वीर्य विरुद्ध-आयुर्वेदानुसार पदार्थाची शक्ती म्हणजे वीर्य .वीर्य हे मुख्यता:२ प्रकारचे सांगितले आहे उष्ण आणि शीत.कधी हि उष्ण वीर्य असणाऱ्या पदार्थासोबत शीत वीर्य असणारी पदार्थ खाऊ नये जसे दुध बरोबर मासे,मुंगडाळ खिचडी आणि दुध,मीठ घातलेल्या पदार्थावर मलाई इत्यादी. फ्रुट सलाड हे वीर्य विरुद्ध आहाराचे उत्तम उदाहरण आहे.कधी पण फळे आणि दुध एकत्र घेऊ
नये.पुष्कळ लोकांना गरम गरम सामोसे आणि भाजी खाताना चहा किंवा काफी पिण्याची सवय असते किंवा काही तर याहून अधिक महारथी असतात जे आंब्याच्या रसात दुध घालून घेतात .हे सर्व प्रकार वीर्य विरुद्ध गटात मोडणारे आहे.  

१०.अवस्था विरुद्ध – आजकाळ नाविव युगातल्या स्त्रिया प्रसूती झाल्यानंतर जेवणाचे कुठलेही पथ्य पळत नाही. इतकेच नाही तर डॉक्टर सुद्धा सर्व खायला चालत असा त्यांना निर्देश करत असतात.त्यामुळे बिनधास्त भात,कडधान्य ,बटाटा ,मटार ,वांगी तूर डाळ –चना डाळ यांचे सेवन करत असतात.याचा परिणाम तेह्वा त्यांना काळात नाही पण काही काळा नंतर सुरुवात होते विविध
प्रकारच्या दुखणी ची .प्रसूती नंतर वात दोष वाढलेले असते आणि अश्या वेळी कडधान्य ,वांगी,मटार इत्यादी वस्तूंचे सेवन हे वात दोषाला आणखी वाढविणारे असते आणि परिणामी सांधे दुखी हा व्याधी निर्माण होतो.याला म्हणतात अवस्था विरुद्ध

११.परिहार विरुद्ध- आहार कसे घ्यावे या बद्दल चे नियम पण आयुर्वेदात वर्णन केले आहे शिवाय पाणी कधी घ्यावे ,जेवानंतर काय करावे या बद्दल सुद्धा आयुर्वेदात वर्णन आले आहे .खूप जन म्हणतात आह्मी जेवानंतर शत पाऊली करतो .जेवणानंतर शत पाऊली करणे हे निर्देशित असले तर हि शत पाऊली कशी करावी याची कल्पना लोकांना नसते .जेवणाच्या नंतर ताबडतोब
शतपाऊली केली कि शरीरात आम तयार होत असतो म्हणून हि शातापौली जेवणाच्या किमान अर्ध्या तासाने करावी तरच फलदायी ठरेल. जेवणाविषयी दिलेले नियम तोडणे म्हणजेच परिहार विरुद्ध 


१२.पाक विरुद्ध-अर्धवट शिजलेले अन्न खाणे,कच्ची कड धान्य खाणे किंवा अधिक शिजलेले किंवा जळलेले पदार्थ घेणे याचा समावेश पाक विरुद्ध आहारात होतो.निशाला डेंगू झाला त्यामुले तिची जेवणाची रुची पूर्ण गेली. दवाखान्यात सुटल्यावर घरी आली असता आई ने जेवणाची भडीमार सुरु केली.आधीच तीव्र कालीन तापामुळे अग्नी मांद्य आणि त्यावर आई ने केलेला दुध,तूप,सुका मेवा याचा भडीमार हा पोट सहन करणार तर कसे?हे प्रकार मोडतात पाक विरुद्ध गटात.

१३.संयोग विरुद्ध-दुधासोबत आम्लीय पदार्थाचे सेवन,दुध आणि केली सोबत घेणे,सम प्रमाणात मध आणि तुफे सर्व प्रकार संयोग विरुद्ध गटात मोडतात.

१४.उपचार विरुद्ध –रोगानुसार पथ्य पाठ्य आयुर्वेदात संगीतली आहे.आजारात सांगितलेली पथ्य न पाळणे ,स्नेहपान सुरु असताना थंड पदार्थाचे सेवन करणे हे प्रकार मोडतात उपचार विरुध्द गटात .
१५.हृदय विरुद्ध –हृदयाला न आवडणारे पदार्थ खाणे म्हणजे हृदय विरुद्ध .अरुचकर,शिळे अन्न ,अधिक खारट किंवा अधिक कडू पदार्थ यांचे सेवन.माझा मुलगा न दुध अजिबात घेत नाही आणि माझ्या जाऊचा मुलगा तर २-३ ग्लास भर दुध घेतो .म्हणून तो अंगाकाठला कसा गुळगुळीत आहे आणि हा आमचा डूग्गु असा बारक्या आहे कि .म्हणून मी याला दुध बळजबरीने पाजते .पण
काय करू तो ओक-ओक करून सर्व काढून टाकतो अशी अनिता मला म्हणाली.जे ज्याला आवडत नाही ते त्या जबरदस्तीने भरविले तर ते शरीराला कसे हो लागणार हे आजकाल कसे लोकांना काळात नाही?

१६ .संपत विरुद्ध आहार –म्हणजे गुण संपन्न नसलेला आहार .आज समाचार पत्रातून किंवा बातम्यावरून आपल्याला बिस्कट,पाणीपुरी,पाकेट मधील दुध,नुडल्स हे सर्व कसे आणि कोणत्या पदार्थापासून तयार करत असतात हे दाखविण्यात येते .तरी पण आपण हा आहार चाविस्कर आहे म्हणून निकृष्ट असला तरी घेत असतो याला म्हणतात संपत विरुद्ध.


१७.क्रम विरुद्ध –भूक नसताना जेवण करणे,अथवा भुकेची वेळ गेल्यावर जेवण करणे अथवा पोट साफ झाले नसताना जेवण करणे या सर्वांचा समावेश क्रम विरुद्ध आहारात होतो.


१८ .विधी विरुद्ध आहार- अस्वच्छ ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी बसून जेवण करणे.अथवा अस्वच्छ हातानी जेवण करणे ,चुकीच्या माणसाच्या संगतीत राहून जेवण करणे,मनात द्वेष,मत्सर,सूड हि भावना ठेवून जेवण करणे या सर्वांचा समावेश विधी वृद्ध आहारात होतो.  जेह्वा आहार हा नित आणि पद्धतशीर प्रमाणे घेतलाच तर च तो शरीराला लागेल आणि खर्या अर्थाने आरोग्यकारक ठरेल.ह्या गोष्टी लहान असल्या तरी ,यामुळे होणारी चूक हि जन्मभर ची शिक्षा देणारी ठरू शकते म्हणून ‘विरुद्ध आहार सैदेव त्याज् ‘असे म्हंटले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.