हृदयद्रावक ! सूरतमध्ये करोनामुळे १४ दिवसांच्या बालकाचा मृत्यू|Heartbreaker! 14-day-old baby dies due to corona in Surat

Share This News

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद, सूरत, वडोदरा या शहरांना करोना संक्रमणानं विळखा घातलेला दिसतोय. सूरतच्या न्यू सिव्हिल रुग्णालयात अवघ्या १४ दिवसांच्या चिमुरड्याचा करोना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अवयव निकामी झाल्यामुळे (मल्टीपल ऑर्गन फेल्युअर) बालकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
सूरतच्या आणखी एका खासगी रुग्णालयात आणखीन एका १४ दिवसांच्या मुलीला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं समजतंय. अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, करोनामुळे होणाऱ्या मृत्युत १५ टक्के मृत्यू तरुण रुग्णांचे होत आहेत. गुजरात राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ७ हजार ४१० रुग्ण आढळले आहेत तर ७३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.