ब्रह्मपुरी तापले; देशातील सर्वाधित तापमानाची नोंद Brahmapuri heated; Record the highest temperature in the country

Share This News

नागपूर : मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाळा चांगलाच तापत आहे. आता विदर्भातील पारा चाळीशी पार गेला आहे. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे तापमान देशातील सर्वाधिक उष्ण ठरले आहे. सोमवार, ८ मार्चला ब्रह्मपुरीत पारा ४०.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला.
अकोला आणि चंद्रपूरमध्येही तापमान चाळीशीला टेकले आहे. अकोल्यात ३९.५ अंश सेल्सिअस तर चंद्रपुरात ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच विदर्भ, मराठवाड्यात पारा चढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे यंदाचा मे महिना अधिक तापण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पारा वाढतीवर असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये रस्ते दुपारी ओस पडत आहेत. कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ नोंदविण्यात येत आहे. पारा चढतीवर असल्याने सकाळी नऊनंतर सर्वत्र उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यात विदर्भातील नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.