तारांवरील मांजा काढण्याचे हायकोर्टाचे आदेश

Share This News

नागपूर : शहरात आजही झाडे, विजेचे खांब, तारांमध्ये नायलॉन मांजा अडकलेला आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या जिवाला धोका आहे. हा मांजा तातडीने काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.


नायलॉन मांजासंदर्भात उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. यासंदर्भातील सुनावणी करताना न्यायालय म्हणाले की, मांजा काढण्यासाठी मनपा एनजीओ व सतर्क नागरिकांची मदत घ्यावी. नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आकाशातील शेकडो पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडतात. अनेक दुचाकीस्वारांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. या वर्षात शहरात आतापर्यंत तिघांचा नायलॉन मांजामुळे मृत्यू झाला. त्या अपघातांची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयापुढे सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वरील आदेश दिले. न्यायालयमित्र म्हणून अ‍ॅड. देवेन चौहान, महापालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.