सांगलीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, आटपाडी पोलीस निरीक्षक अटकेत High profile sex racket destroyed in Sangli, Atpadi police inspector arrested

Share This News

सांगली

कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेला हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. पोलिस निरीक्षकासह ६ जणांना अटक करण्यात आली. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादव, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. वेश्या अड्ड्यावर पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पिटा (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक) कायद्यानुसार हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे ही कारवाई अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक च्या पोलीस अधिकारी मायादेवी काळगावे यांनी केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.