मुंबई जीपीओचा इतिहास ई-पुस्तक रूपात; राज्यपालांच्या हस्ते डिजिटल प्रकाशन History of Mumbai GPO in e-book form; Digital publication at the hands of the Governor

Share This News

मुंबई, दि. १6 : १०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई जनरल पोस्ट ऑफिसच्या इतिहासावर आधारित पहिल्या ई-पुस्तकाचे डिजिटल प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.

मुंबई जीपीओचा इतिहास ई-पुस्तक रुपात उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करुन राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, जीपीओला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. देशातील प्रत्येक भागात पोस्ट ऑफीस सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेले आहे. या पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून अनेकांना चांगले अनुभव आले आहेत. अशा अनुभवांचा, लोकांच्या प्रतिक्रियांचा आणि कथांचा संग्रह करुन प्रभावी पुस्तिकेची निर्मिती केल्यास पोस्ट विभागाचा ऐतिहासिक ठेवा या संग्रहाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी उपलब्ध करता येईल, यासाठी पोस्ट ऑफीसने प्रयत्न करावेत. मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू आहेत. हा राष्ट्रीय ठेवा असून तो सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मुंबई पोस्ट ऑफीस नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून त्याचे जतन करीत आहे. याचा आनंद आहे. नवनवीन संकल्पनांच्या आधारे ई-पुस्तकाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा यापुढील काळातही जतन केला जावा, असे भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी महाराष्ट्र- गोवाचे चीफ पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, मुंबई विभागाच्या चीफ पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी मुंबई जीपीओचा इतिहास, कामकाजाची माहिती आणि अविरत सेवेबाबत माहिती दिली.या ई-पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र- गोवाचे चीफ पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, मुंबई विभागाच्या चीफ पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे तसेच मुंबई जीपीओचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.