सायबर हल्ल्यावरून गृहमंत्री, ऊर्जामं‌त्र्यांनी मुर्ख बनविले Home Minister, Energy Minister fooled by cyber attack

Share This News

नागपूर : मुंबईतील वीज खंडित होण्याच्या प्रकारात गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कपोलकल्पित अहवालाच्या आधारे महाराष्ट्रातील तमाम जनतेचा मुर्ख बनविल्याचा आरोप भाजपचे नेते तथा राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीच्या आधारावर सायबर विभागाचा एक आयपीएस अधिकारी अहवाल तयार करतो, ही मुळातच हास्यास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. हा अहवाल तयार करताना संबंधित आयपीएस अधिकाऱ्यांचे देशाचे परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, आयबी आदींशी समन्वय साधून सत्य शोधायला हवे होते. मात्र अशा कोणत्याही पद्धतीने तपास झालेलाच नसल्याने बावनकुळे म्हणाले. या कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर गृहमंत्री, ऊर्जामंत्री जर विश्वास ठेवत असतील व तो प्रसार माध्यमांपुढे सादर करत असतील तर हे राज्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल असे ते म्हणाले. अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपविण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एक तपास समिती नेमली आहे. सुबोध गोयल, रामाक्रिष्णन, व्हीजेटीआयचे प्रा. काजी यात आहेत. या समितीने अशा सायबर हल्ल्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.


मुंबईला पुरवठा करणाऱ्या चार लाइनपैकी दोन लाइन बंद पडल्या. इतर लाइनवर ताण आल्याने मुंबईचा पुरवठा खंडित झाल्याचे बावनकुळे म्हणाले. विजेचे कंडेक्टर सायबर हल्ल्याने फेल होऊ शकत नाही. त्यामुळे १२ ऑक्टोबरला झालेला प्रकार हा शुद्ध निष्काळजीपणा असल्याचे माजी ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.