अतिरेकी बळाचा वापर करू नका : गृहमंत्र्यांच्या सूचना

Share This News

नागपूर : कोरोना आणि लॉकडाउनमुळे नागरिक त्रासले आहेत. आर्थिक चक्र थांबले आहे. अशात पोलिसांनी नागरिकांवर अतिरेकी बळाचा वापर न करता योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिल्या.
लॉकडाउन संदर्भात आयोजित आढावा बैठकीला नागपुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गृहमंत्र्यांनी हजेरी लावली. लॉकडाउन जेव्हा कडक होते, त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली. परंतु आता पूर्णत: लॉकडाउन नाही. त्यामुळे लोकांना लाठाकाठ्यांनी मारू नका. बळाचा अतिरेकी वापर करू नका. नियंत्रण ठेवा मात्र कुणी उपद्रव निर्माण करीत असेल तर त्याला सोडू नका अशा सक्त सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या.
कोरोना अद्यापही कायम आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवायचे आहे. अशात रोजगाराच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडणारच. त्यामुळे योग्य कारवाई करावी असे गृहमंत्री म्हणाले. हेल्मेट, सीटबेल्ट आदीच्या कारवाई मात्र नेहमीप्रमाणे सुरू ठेवाव्या असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.