जागतिक दर्जाच्या ‘लॅन्सेट’ मध्ये डॉ राणी बंग यांच्या कार्याचा गौरव

Share This News

जगातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिक असलेल्या ‘लॅन्सेट’ ने डॉक्टर राणी बंग यांच्या कार्याची पुन्हा एकदा दाखल घेतली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अंकात डॉक्टर राणी बंग यांनी स्त्रीरोग व प्रसूतीकाळातील महिलांच्या आरोग्यविषयक केलेल्या संशोधन व कार्यावर विस्तृत लेख लिहिला आहे. ‘Rani Bang—leader in women’s reproductive health’ अशा शब्दात डॉक्टर राणी बंग यांचा लॅन्सेट ने गौरव केला आहे.  यापूर्वी लॅन्सेट मध्ये डॉक्टर अभय बंग व डॉ राणी बंग यांच्याविषयी जानेवारी २०११ च्या अंकात ‘ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे प्रणेते’ असा गौरव करण्यात आला होता. लॅन्सेट या वैद्यकीय मासिकाची स्थापना १८२३ मध्ये इंग्लंड येथे झाली असून तेंव्हापासून हे नियतकालिक नियमित छापल्या जात आहे. जगातील वैद्यकीय व विज्ञान क्षेत्रात हे नियतकालिक अतिशय प्रतिष्ठेचे समजल्या जाते. 
राणी बंग यांनी स्त्री आरोग्यावर विशेष कार्य केले आहे,खासकरून गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात कार्यरत असताना ग्रामीण भागातील स्त्री आरोग्याविषयी त्यांचे कार्य व संशोधन महत्वाचे आहे. प्रसूती नंतरचा काळ व स्त्री आरोग्याच्या समस्येवर १९८८ मध्ये डॉक्टर राणी बंग यांनी ग्रामीण भागातील महिलांवर एक अध्ययन केले होते,हे जगातील प्रसूती काळानंतर ग्रामीण भागातील महिलांवर केलेलं पहिले अध्ययन ठरले होते.
डॉक्टर राणी बंग यांनी भारतातील ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी व्यापक पुनरुत्पादन आरोग्य सेवा पॅकेजची आवश्यकता असल्याचे सांगितले. या अभ्यासानुसार संपूर्ण जगात विशेषतः अविकसित व विकसनशील देशात प्रजनन आरोग्याचा कार्यक्रम सुरु झाला. सुमारे ९२ टक्के स्त्रियांमध्ये स्त्रीरोग विषयक समस्या असतात असे डॉक्टर राणी बंग यांच्या संशोधनातून दिसून आले. त्यांच्या या क्षेत्रातील संशोधनाने या विषयीचे जगभरातील समज बदलले आणि त्यानुसार ग्रामीण स्त्री आरोग्याविषयी जागतिक धोरण बदलण्यास मदत झाली आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.