नागपूर शहरात भीषण अपघात; तरुणी ठार, तीन जखमी

Share This News

नागपूर : शहरातील सुरभी चौकात भरधाव कार रस्ता दुभाजकावर आदळून उलटल्याने तरुणी ठार झाली. तिच्या भावासह तीन जण जखमी झालेत. रविनगर चौकातील सुरभी हॉस्टेलसमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
बरखा हरीश खुराणा (वय २४) हे मृत तरुणीचे नाव आहे. तिचा भाऊ लक्की हरीश खुराणा (वय २२), चुलतबहीण रिया जगन्नाथ खुराणा (वय २३) व प्रेम अशोक चंदनानी (वय २०, सर्व रा. शांतीनगर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धंतोलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रियाची प्रकृती चिंताजनक आहे. बरखा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला होती.
शुक्रवारी रात्री चौघे अमरावती मार्गावरील वंडर्स ऑफ वंडर या हॉटेलमध्ये जेवायला गेले. मध्यरात्री चौघेही एम.एच.२८-एएन-१७२६ या क्रमांकाच्या कारने नागपूरकडे येत होते. प्रेम हा कार चालवित होता. त्याच्या बाजूला लक्की बसला होता. कारचा वेग अधिक होता. सुरभी हॉस्टेलसमोर प्रेमचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्ता दुभाजकावर आदळली व उलटली. चौघेही जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धावाधाव केली. माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. गंभीर जखमी बरखाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रेमविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्की मॉडेलिंग करतो. त्याच्या वडिलांचे सायकलचे शोरूम आहे. प्रेमच्या वडिलांचे गांजाखेत चौकात कापडाचे शोरूम आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.