काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी कसा दिला आपल्यास सरकारला घरचा आहेर How Congress leader Sanjay Nirupam gave the government a home run

Share This News

मुंबई ः सचिन वाझे प्रकरणाचा आतापर्यंतचा तपास पाहता हे सत्ता प्रायोजित हप्ता वसुलीचे प्रकरण असल्याची टीका काँग्रेसचे नेते संजय निरूपण यांनी केली आहे. निरूपम यांनी यातून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना मांडताना निरूपम म्हणाले की, शिवसेना परमबीर सिंह यांचा जयजयकार करीत आहे. राष्ट्रवादीचे नेते असलेले गृहमंत्री आयुक्तांची चूक असल्याचे सांगत आहेत. ही विरोधाभासी वक्तव्ये सरकारची प्रतिमा आणखी मलीन करीत आहेत. वाझे प्रकरणातील आतापर्यंतचा तपास पाहता हे सत्ताधाऱ्यांचे हप्तावसुली कांड असल्याचे लक्षात येते. त्याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत काय, असा बोचरा सवालही निरूपम यांनी उपस्थित केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.