ईडीच्या आतल्या गोष्टी भाजपच्या माकडांना कशा कळतात?; संजय राऊतांचा सवाल

Share This News

मुंबई: गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली जात आहेत. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली, ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीनं समन्स बजावलं असून त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.  ‘केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारं वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात.

पूर्वी सीबीआय, ईडीनं कारवाई केली की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचं. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षानं भडास काढणं हे लोकांनी गृहित धरलंय,’ अशा शब्दांत राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ३ नेते ईडीच्या कार्यालयात जातात. तिथून ते काही कागदपत्रं घेऊन बाहेर येतात. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि त्यांचे हस्तक मला भेटायचा प्रयत्न करत आहेत. राज्यातलं सरकार टिकू देऊ नका म्हणून माझ्यावर विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘राज्यातलं सरकार आम्ही पाडायचं ठरवलं आहे. त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. मला इशारे दिले जात आहेत. धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी त्यांचा बाप आहे. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही,’

अशा इशारा त्यांनी भाजपला दिला. ‘माझ्यावर दबाव आणण्यासाठी शिवसेना आमदारांची नावांची यादी दाखवली गेली. या आमदारांना ईडी ताब्यात घेईल. त्यांचे राजीनामे घेतले जातील. सरनाईक हे याच कारवाईचं टोकन आहे, असं सांगण्यात आलं. पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे सरकार पडणार नाही,’ अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर जोरदार शरसंधान


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.