विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले

Share This News

मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.
आगीत ४५ वर्षीय कुमार दोषी यांचाही दुर्देवी मृत्यू झाला. ते वसईतील 100 फूट रोड परिसरात राहत होते. कुमार दोषी यांच्या पत्नी चांदणी दोषी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर विरारच्या जीवदानी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी चांदणी यांना पतीच्या निधनाची बातमी मिळताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.