पतीकडून पत्नीच्या वडील आणि भावाची हत्या……

Share This News

अमरावतीः पत्नीच्या वडिलांची आणि भावाची हत्या करून पत्नीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत उघडकीस आलीय. फारकत घेऊन आजोबांकडे राहत असलेल्या पत्नीला जबरीने आणावयास गेलेल्या जावयाने तिच्या वडिलांची आणि  भावाची चाकून करत हत्या जखमी करत र घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील कुरळ पुर्णा येथे घडलीय.

आरोपी रवी सुरेश पर्वतकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीच्या आईच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी रवी सुरेश पर्वतकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आरोपी रवी दोघांची हत्या करून पत्नीला गाडीवर बसवून पसार झाला, या खळबळजनक घटनेने खळबळ उडाली.

आरोपी रवी पर्वतकर आणि मुलगी हर्षा यांचा प्रेमविवाह झाला होता

मुलीची आई कुरळपूर्णा येथील रहिवासी मीरा बंडू साबळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रवी पर्वतकर आणि मुलगी हर्षा यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर त्यांचे आपसात पटत नसल्याने दोघांतील समझोत्याने 27 नोव्हेंबर 2020 रोजी फारकतनामा झाला होता. तेव्हापासून मुलगी हर्षा माहेरी अमरावतीलाच राहत होती.

मीराचे पती बंडू आणि मुलगा धनंजय यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांची हत्या

मात्र आरोपीने घर गाठून मारहाण केली, तर आमच्या मुलीला तू मारझोड करतोस म्हणून घेऊन जाऊ नकोस, असे हर्षाच्या आई-वडिलांनी रवीला सांगितले. यावर हर्षा माझी पत्नी आहे, मी घेऊन जाईन, तुम्ही अडवणारे कोण? अशा प्रकारे धमकावले. फिर्यादी मीराचे पती बंडू आणि मुलगा धनंजय यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांची हत्या केली, तर हर्षाचे आजोबा विश्वनाथ साबळे यांच्या गुप्तांगावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. गाडीवर बसवून हर्षाचे अपहरण करून आरोपी जावयी रवी पसार झालाय.

जिल्ह्यात 48 तासांत चौघांची हत्या

तर अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाची हत्या करण्यात आली होती, तर तिवसा तालुक्यात देखील एकाची हत्या करण्यात आलीय, त्यामुळे जिल्ह्यात 48 तासांत चौघांची हत्या करण्यात आल्याने जिल्हात कायदा आणि सुव्यवस्थाचा मोठा प्रश्न उपस्थित झालाय.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.