कुर्‍हाडीने वार करून पतीने केली पत्नीची हत्या,बघेडा येथील घटना Husband stabs wife to death, incident at Bagheda

Share This News

सिहोरा(तुमसर),दि.19ः तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बघेडा येथील आठवडी बाजारात पतीने आपल्याच पत्नीची कुर्‍हाडीने वार करून तिची हत्या केल्याची घटना १८ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. शीला शिशुपाल बर्वे (वय ३४) रा. आष्टी असे मृत महिलेचे नाव आहे. तर शिशुपाल बर्वे (वय ४०) रा. पिपरा असे आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, शीला बर्वे ही आपल्या पतीपासून अंदाजे आठ ते दहा वर्षापासून आपल्या माहेरी आईकडे दोन मुलांसह राहत होती. त्याच विभक्त राहणाऱ्या पत्नीचा तिच्याच पतिने जुन्या वैमनैशातून रागाच्या भरात कुर्‍हाडीने वार करून तिची निर्घुण हत्या केली.
बघेडा हे गाव तुमसर पासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. गुरुवारला त्या गावी आठवडी बाजार भरतो, शीला बर्वे ही १८ मार्च रोजी बाजारात भाजीपाला विक्री करण्याचा व्यवसाय करीत असल्याने सायंकाळपर्यंत बाजारातच होती. त्याच संधीचा व अंधाराचा फायदा घेत, आरोपी पती शिशुपाल ने आपल्याच पत्नीवर कुर्‍हाडीने सपासप वार करून तिला यमसदनी पाठविल्याची घटना उघडकीस आली असून सदर घटनेतील आरोपी शिशुपाल बर्वे राहणार पिपरा हा घटनास्थळावरून पसार झाला. आरोपी पती व मृतक पत्नी हे एकमेकापासून मागील दहा वर्षापासून विभक्त राहत होते. याच दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून पती-पत्नीचा वाद विकोपाला गेला होते. त्यातुंच हे हत्येचे प्रकार घडले आहे. सदर घटनेमुळे बघेडा व परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास पोलीस स्टेशन गोबरवाहीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करीत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.