मी दीपालींना मदत करू शकली नाही, खासदार राणांच्या डोळ्यात पाणी

Share This News

अमरावती : ‘हरीसाल येथील वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी मला रेकॉर्डिंग ऐकविले होते. पण मी त्यांना वेळीच मदत करू शकली नाही. मी मदत केली असती तर त्यांचा जीव वाचला असता’, असे नमूद करताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना डोळ्यातील पाणी अनावर झाले.
दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण खासदार नवनीत राणा यांनाही रेकॉर्डिंग ऐकविल्याचे नमूद केले आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना खासदार राणा म्हणाल्या की, मी चव्हाण यांना वेळीच मदत करायला हवी होती. मी मदत केली असती तर कदाचित त्या वाचल्या असत्या. दरम्यान राणा यांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांना कोंडीत पकडले आहे. चव्हाण यांनी मदत मागितली होती, तर तेव्हा मदत का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एका अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्याच्या ‘हत्येत’ सहभागी होण्यासारखेच आहे.

प्रामाणिकपणाचा बळी
दीपाली ही व्यवस्थेचा बळी गेल्याचा संताप त्यांचे पती राजेश मोहिते यांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत विनोद शिवकुमार यांच्याशिवाय अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना अटक होत नाही, तोपर्यंत दीपालीचे पार्थिव ताब्यात घेण्यास परिवाराने नकार दिला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.