सव्वा वर्षापासून तेच सांगतोय, आवाजच पोहोचत नाही : फडणवीस I have been saying the same thing for a quarter of a year, the voice is not reaching: Fadnavis

Share This News

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भाषणवरल अभिनंदन प्रस्तावावर बोलताना भाजपचे नेते तथा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खास आपल्या शैलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.


मुख्यमंत्री ठाकरेंचे सरकार म्हणजे केवळ ‘फेसबुक लाइव्ह’वर चालणारा खेळ आहे. मुख्यमंत्र्यांचे २१ फेब्रुवारीचे फेसबुक लाइव्ह चांगले होते. त्यात मुख्यमंत्री म्हणाले होते की, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. नेमके हेच विरोधी पक्ष सव्वा वर्षापासून सांगण्याचा प्रयत्न करतेय की जनतेचा आवाज मुख्यमंत्री व सरकारपर्यंत पोहोचतच नाही, असे फडणवीस म्हणाले. विरोधी पक्ष सांगत होता की लोकांचा आवाज सरकारच्या कानावर जातच नाहीये पण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही कबुली दिली ते बरे झाले, असे ते म्हणाले. राज्यपालांच्या भाषणाबाबत सरकारवर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, असे भाषण चौकांवर आयोजित करण्यात येणाऱ्या सभांमध्येही दिली जात नाही.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.