चहा करायला गेली, गॅसची नळी पेटली अन‌्…. I went to make tea, the gas pipe ignited and ….

Share This News

वर्धा : चहा करण्यासाठी महिलेने घरातील गॅस शेगडी पेटवली. तेवढ्यात नळीतून गॅसचे लिकेज सुरू झाले. बघता बघता नळीने व काही वेळात सिलिंडरने पेट घेतला व घराची राखरांगोळी झाली. या आगीने महिलाही गंभीरपणे भाजली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या आर्वीत ही घटना गुरुवार, ११ मार्चला घडली.


आगीमुळे संबंधित घरातील जीवनपयोगी वस्तूंसह धान्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. आर्वी येथील संजय चौके यांच्या पत्नी दुर्गा गुरुवारी सकाळी गॅसवर चहा करायला गेल्या. त्यावेळी नळीतून गॅसची गळती झाली. नळीचे अचानक पेट घेतला. यामळे दुर्गा यांच्या अंगावरील कपड्यांना आग लागली. यात त्या गंभीरपणे भाजल्या. बघता बघता घरात सर्वत्र आग पसरली. नागरिकांना धावाधाव करून दुर्गा यांना आगीतून वाचिवले पण घर पूर्णपणे खाक झाले. दुर्गा यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमुळे चौके यांनी विक्रीसाठी आणलेले कपडे, कपाटातील रक्कम, २० क्विंटल कापूस, तुर, चणा, गहू, तांदूळ खाक झाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.