शहरात पाऊस, गारठा वाढला तर थंड हवेच्या वेग सुरू

Share This News

नागपूर
नागपूर, विदर्भात जानेवारी महिन्याच्या मध्यानंतर खर्‍याअर्थाने थंडीची तीव्रता जाणवू लागली होती. बदललेल्या निसर्गचक्रामुळे मंगळवारी व बुधवारी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरत मंगळवारी नागपूर शहरात रात्री मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. विदर्भातही अनेक ठिकाणी असाच पाऊस झाला.
विदर्भ, कर्नाटक व मराठवाड्याच्या भागात समुद्र सपाटीपासून 0.९ किमीवर एक कुंड तयार होत आहे. यातून आकाशात ढग दाटून येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस होण्याची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकांची तत्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असे विभागाकडून शेतकर्‍यांना आधीच सांगण्यात आले होते. याव्यतिरिक्त कापूस पिकाची वेचणी राहिली असल्यास लवकरात लवकर ती आटोपती घेत सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील पिकास आवश्यकता नसल्यास ओलित करणे पुढे ढकलावे, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, नागपूर शहरात दिवसभर वातावरण सर्वसामान्य होते, संध्याकाळीनंतर रात्री अचानक थंडीचा कडाका वाढला. मेघगर्जना सुरू झाली आणि पावसाचे वातावरण तयार झाले.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.