शेतकरी आंदोलन मोडुन काढले तर अराजकता माजेल – ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे

Share This News

दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना खलिस्तानी म्हणने म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे. ते खलिस्तानी किंवा माओवादी नाही. ते फक्त आंदोलन करणारे शेतकरी आहे. सरकारने असे खोटे आरोप केले तर या आंदोलनाला वेगळे वळण लागेल. सरकारने शेतकरी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न केला तर देशात अराजकता माजेल, असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी सरकारला दिला. सीबीएस येथे शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रांगणात सोमवारी आयोजित किसान संघर्ष संवाद यात्रेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
नविन कृषी बिले रद्द करावी व शेतकर्‍यांना हव्या असलेल्या हमीभावाचा सरकारने कायदा करावा. शेतकरी संघटनांची ही प्रमुख मागणी आहे. त्याशिवाय त्यांना इतर काहि नको सरकारकडून. सरकारने हे आंदोलन मोडित काढले किंवा आंदोलनात फुट पाडली तर त्याचे मोठे दुष्परिणाम होईल. देशात मोठया प्रमाणात अराजकता माजेल. सरकारच्या हाताबाहेर परिस्थिती जाईल. अराजकतेतून कोणतेही प्रश्न सुटत नाही. त्यातून गोरगरिबांचेच हाल होतील. विशेषकरुन महिलांचे. कृषी कायदे रद्द झाले पाहिजे ही शेतकर्‍यांची मागणी रास्त आहे. सरकारने शेतकर्‍यांचा मालाला हमीभाव दयावा याबाबत सरकारने कायदे करावा. सरकारने आंदोलकांना खलिस्तानी म्हणने थांबवावे अन्यथा गंभिर परिणाम होतिल असे त्यांनी सांगितले

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.