खंडणीऐवजी ऑक्सीजनसाठी प्रयत्न केले असते तर…

Share This News

भाजपचे महाविकास आघाडीवर घणाघाती प्रहार
मुंबईः नालासोपाऱ्यात ऑक्सीजन उपलब्ध न झाल्याने सात रुग्णांना प्राण गमावावे लागल्याच्या कथित घटनेनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे आसूढ ओढले आहेत. खंडणीऐवजी ऑक्सीजनची व्यवस्था केली असती तर लोकांचे जीव वाचविता आले असते, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असून सर्वत्र संसाधनांचा अभाव जाणवत आहे. अशातच नालासोपाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.