चंद्रपूर : विदेशी पर्यटकांवर तत्काळ बंदी घाला

Share This News

चिमूर
जगात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ‘वाघाची पंढरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक वाघाची झलक पाहण्यासाठी ताडोबाला मुक्कामी येत असतात. सेलिब्रिटी, स्टार, उद्योजक, खेळाडू आदी वाघ बघण्यासाठी येत असतात. जगात कोरोनाने थैमान घातल्याने संपूर्ण देश होरपळून निघाला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर हादरा बसला.
सध्या कोरोनाचे संकट जरी कमी होत असले तरी नुकतेच ब्रिटिशवरून नागपूरला आलेला व्यक्ती नवीन संक्रमित पॉझिटिव्ह आढळून आल्याने नवीन कोरोनाचा धोका वाढला आहे. सध्या विदेशात कोरोनाचा कहर वाढल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या कोलारा, मदनापूर, अलिझंझा, नवेगाव या गेटवरून विदेशी पर्यटकांची तुंबळ बघायला मिळत आहे. या विदेशी पर्यटकांमुळे नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला जबाबदार कोण ? ताडोबा प्रशासन महसूलवाढीवर भर देत आहे पण सामान्य जनतेचं काय ? अशा परिस्थितीत ताडोबा प्रशासनाने विदेशी पर्यटकांवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.