गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवारImplement concrete measures to control the crowd – Deputy Chief Minister Ajit Pawa

Share This News

बारामती – बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती  येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला  पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजकुमार लोहियाजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुखजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादउपवनसंरक्षण पुणे विभाग राहूल पाटीलअपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहितेमहावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडेउपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळेतहसिलदार विजय पाटीलगटविकास अधिकारी राहूल काळभोरनगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव आदींसह विविध विभागाचे अधिकारीप्रतिनिधी  उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेसध्या पुणे जिल्ह्यात तसेच बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. तसेच बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेतयावर  प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहेयाकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावासंस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावागृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. कोविडशी लढण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीची  कमतरता भासणार नाही  याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.