२०२४ मध्ये हिंगण्याचा आमदार राष्ट्रवादी चा असेल – जयंत पाटील
हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार संवाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्ष्याच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी काढलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्याने वानाडोंगरी हिंगणा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणावर परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२०२४ मध्ये हिंगणा विधानसभेवर शरद पवार साहेबांच्या विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आनण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज पासूनच कामाला लागावे. तळागळातील लोकांची कामे प्रामाणिक पणे करावे. आणि गावातील शेवटच्या माणसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहचवावी. बूथ कमेंट्यांच्या माध्यमातून पक्ष मजबूत केला तर समोर कोणीही उमेदवार असो आपला विजय पक्क पण यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागने गरजेचे आहे. या मतदार संघात माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्यावर प्रेम करणारा आणि राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. असे कार्यकर्त्यांना सबोधतांना राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणा विधानसभेचे अध्यक्ष प्रकाश नागपुरे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे यांनी मानले.